बरेच दिवसांत खूप काही घडून गेलं आणि काळ एकदम पुढे गेल्यासारखं वाटलं, वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरांवर सगळीकडेच. वेगात घटना घडत आहेत आणि त्या त्यावेळी मनात असलेलं बोलायचं, लिहायचं राहून जातय असं वाटू लागलं. थोडं लिहिलं किंबहुना लिहू म्हटलं तरी विचारांत सुसंगती येते (आल्यासारखी वाटते) शिवाय जाता जाता आपल्या मताची नुसती पिंक टाकण्यापेक्षा एखाद्या प्रश्नाचा, मुद्द्याचा अधिक सखोल विचार केला जातो. दुसरा मुद्दा म्हणजे माझ्या मनातले विचार इतरांपर्यंत पुन: पुन्हा पोहोचू शकतात त्याचं समाधान मिळतं ते वेगळच.
असो, तर मराठीच्या मुद्द्यावर मराठी मतांची व्यवस्थित फोडाफोडी करुन आघाडीचे सरकार सत्तेवर आले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढच्या निवडणूकीपर्यंत सुखाने पादा पण नांदा म्हणून शुभेच्छा! मनसेने जी मुसुंडी मारलेय त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. उद्धव साहेबांनी कॊर्पोरेट कल्चर आणण्याचा प्रयत्न केला जरुर, पण निकाल पहाता त्यांच्या बयाचश्या खेळी चुक्या म्हणजे खूप्पच चुक्याच! सदा सरवणकराची वासलात लावून, काल पक्षात आलेल्या आदेश बांदेकरला उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली आणि दोघेही (आदेशराव आणि शिवसेना) दादरसारख्या ठिकाणी तोंडावर आपटले, त्यातही सदा सरवणकर कॊग्रेसला जाऊन उमेदवारी मिळवता झाला (तेथल्या स्थानिक कॊग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अन्यायच तो!) आणि त्यात फायदा मात्र झाला मनसेचा. जय हो! एकूण निकाल पाहाता, मराठी मतदारला चुचकारण्यात राजसाहेबांना यश येतेय यात वाद नाही आणि मला व्यक्तिश: ह्याचा आनंदच वाटतो. निदान कोणीतरी मराठी बाणा (आठवा डोंबिवली फास्ट) दाखवतो आणि मी मराठी आहे असे अभिमानाने सांगतोय (मतांसाठी का होईना!), हे ही नसे थोडके. खरं सांगायचं म्हणजे, माझ्या लहानपणी पाहिलेली शिवसेना मला आज मनसेमध्ये दिसतेय आणि माझाच कुठलातरी इगो सुखावतोय. शिवसेनेची राज्यस्तरीय पक्ष म्हणून वाढ होत असताना भाजपासारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षाबरोबर युती असल्याने शिवसेनेची वैचारीक दमछाक आणि कोंडी होतेय. आजही ठाकरेंना सामन्यात अग्रेलेखातून आगपाखड करावी लागतेय, कारण शिवसेनेची अशी ठसठशीत भूमिकाच राहिलेली नाही. निवडणूकीतल्या पराभवानंतर सुद्धा बाळासाहेबांची उद्विग्नता, हतबलता, नैराश्य सामन्याच्या अग्रलेखांतून दिसले पण एक नेता म्हणून उद्धव साहेब पत्रकारांना सामोरे गेलेत, जबाबदरी स्विकारलेय असं चित्र कुठेच दिसलं नाही. तरुणांचा ओढा शिवसेनेकडे पूर्वी इतका राहिला नाही, एक तर राहूल गांधीनी कॊंग्रेसमध्ये युवा कॊंग्रेसच्या माध्यमातून सुशिक्षित तरूण उमेद्वार देऊन तरूण फळी उभारलेय त्यामुळे तरूण मुले तिथे तरी जात आहेत किंवा राजच्या आंदोलनातल्या ग्लॆमर मुळे मनसेकडे तरी. त्यामुळे शिवसेनेचे पुढे काय होणार हा प्रश्नही विषण्ण करतोच. बाळासाहेबांच्या विचारांच्या ठिंणग्यांतून उभारलेली शिवसेना, जिने बरंच काही दिलय महाराष्ट्राला, मुंबईला आणि मराठी माणसाला तिचा भाऊबंदकीमुळे कडेलोट होत असेल तर त्याचं वाईट वाटतच. मनसे आणि शिवसेना एकत्र यावेत आणि बाळासाहेबांनी शिवसेनेचं सुकाणू आपणहून राजच्या हाती द्यावं असं गोड स्वप्न माझ्यासारख्या कित्येकांना पडत असावं पण बाळासाहेबांचा ह्याबतीत तरी धृतराष्ट्र झालाय असं दिसतं. मराठी माणसाचं दुर्दैव, दुसरं काय, मराठीच्या भल्यासाठी इतकं करू शकाल तुम्ही बाळासाहेब?
विधानसभेत मस्तवाल अबू आझमीला चोपला तेव्हा मनात कुठेतरी बरं वाटलंच. विधानसभेसारख्या पवित्र ठिकाणी असं व्हायला नको होतं असे नक्राश्रूही कित्येकांनी ढाळले, पण चोर देवळात लपल्याने साधू होत नाही त्याला प्रसंगी मंदिरात घुसून चोपावे लागते, त्यामुळे झाले ते बरेच झाले. त्या एकंदर प्रकरणाबाबत वृत्तपत्रांत वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आलेल्या बातम्या वाचल्या आणि काही मूलभूत प्रश्न पडले त्यांची उत्तरे शोधायचा प्रामाणिक प्रयत्न सुरु केलाय. मुळात मी संकुचित दृष्टीचा मुळ्ळीच नाही आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती, देश, भाषा ह्यांच्याशी माझं नातं वेगळं आहे, असायलाच हवं. त्यामुळे प्रांतियता, भाषा एका प्रतलात, चौकटीत जपायलाच हवी असं मला मनापासून वाटतं. तसच डावा हात श्रेष्ठ की ऊजवा अशा फालतू वादातही मला अर्थ वाटत नाही त्यामुळे हिंदी भाषा मोठी कि मराठी, भारत जवळचा कि महाराष्ट्र असे प्रश्नच मला अस्थानी वाटतात, दोघेही एकमेकांस पूरक आहेत एवढंच म्हणता येईल.
मी मराठी आहे म्हणजे माझ्यापुरतं नेमकं काय?
१. माझी मातृभाषा मराठी आहे. मी मराठी बोलू, वाचू आणि लिहू शकतो. मला मराठीतून विचार व्यक्त करायला आवडतात. मला मराठी वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक वाचायला आवडतात.
२. मी मराठी साहित्य वाचण्याचा आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मी तुकाराम, रामदास, द्न्यानेश्वर, अत्रे, पुल, जीए, ग्रेस, पाडगावकर, कुसुमाग्रज, सावरकर तसेच इतर कैक मराठी साहित्यकांचा वारसा सांगतो.
३. मराठी रंगभूमी (व्यावसायिक तसेच प्रायोगिक) तसेच मराठी चित्रपटसृष्टीबद्दल मला प्रेम आहे.
४. मी मराठी माणसाशी मराठीतूनच बोलतो.
५. मी शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो. त्यांनी आम्हाला स्वाभिमान, धाडस, शौर्य दिले हे अभिमानाने सांगतो. शिवाजी महाराज झाले नसते तर कदाचित ही भाषा, धर्म, संस्कृती मला मिळालीही नसती ह्याची मला जाणीव आहे (न होता शिवराय, तो सुंता सबकी होती, असे कविवर्यांचे बोल आहेत!).
६. महाराष्ट्राने भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात दिलेल्या योगदानाचा मला अभिमान असून, टिळक, तात्याराव सावरकरांसारख्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी वेचलेल्या आयुष्याची आणि भोगलेल्या कष्टांची मला जाणीव आहे.
७. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ काय होती, ती कशी आणि का झाली ह्याची माहिती मी घेतली आहे शिवाय माझ्या बरोबरीच्या तसेच पुढील पिढीपर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे (ह्यावेळच्या मायबोलीच्या दिवाळी अंकात केदार जोशी यांनी ह्यासंबधी विस्तृत लेख लिहिला आहे.) मुंबई ही महाराष्ट्रात राहावी आणि ती मराठी भाषिकांची व्हावी म्हणून ज्या हुतात्म्यांनी रक्त सांडले त्यांसाठी मी सदैव कृतद्न्य आहे. आज केवळ त्यांच्यामुळेच मी माझ्या महाराष्ट्राचा वारसा सांगू शकतो.
८. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला नविन वर्ष सुरू होत असून गणपती, गोविंदा, दसरा, दिवाळी असे मराठी मनाच्या जवळचे सण मी उत्साहाने साजरे करतो.
९. महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवर आणि वनसंपत्तीवर माझा जीव आहे.महाराष्ट्रात राहाणाया मग तो कुठूनही येवो, प्रत्येकाने इथल्या मातीवर, भाषेवर आणि संस्कृतीवर भरभरून प्रेम करावे, इथे समरसून जावे असे मला मनापासून वाटते.
१०. पुरणपोळी, कांद्याचे थालिपीठ, झुणका भाकर, भरले वांगे असे अस्सल मराठी पदार्थ मला मनापासून आवडतात.
११. महाराष्ट्र राज्यापुढचे प्रश्न तसेच बेळगाव सीमा प्रश्न ह्याबद्दल मी जागरुकतेने माहिती करुन घेतो. तसेच महाराष्ट्रात काम करणाया विविध सामाजिक संस्था, त्यांची कामे आणि समाजसेवक (गाडगेबाबा, फुले, आमटे, लहाने, बावीस्कर इ.) ह्यांविषयी मी सदैव कृतद्न्य आहे.
१२. भारतीय स्तरावर किंवा इतर राज्यातील मित्रांशी बोलताना मी महाराष्ट्राची बाजू मांडतो. मेहनती, स्वयंसिद्ध, हुशार, प्रामाणिक, शूर, पापभिरू, साहित्यप्रेमी अशी मराठी माणसाची प्रतिमा मी इतरांपुढे मांडतो. मराठा रेजिमेंट आणि त्यांच्या पराक्रमाबद्दल अभिमानाने सांगतो. आत्ममग्न, कूपमंडूक, एकीचा अभाव, भाऊबंदकी, व्यापार तसेच खूप पैसे कमाण्याविषयी अनास्था असे मराठी माणसाचे दुर्गुणही मी मान्य करतो :)
मुख्य म्हणजे माझी मातृभाषा मराठी असणं आणि मी महाराष्ट्रीय असणं हे मी भारतीय असण्याच्या कुठेही आड येत नाही. जसे की मी एकाचवेळी कोणाचा तरी नवरा आहे, मुलगा आहे, भाऊ आहे आणि बापही. त्यांच्याशी माझी नाती ही परस्परपूरक राहातील अशी ठेवणे मला महत्त्वाचे. तसच भाषेचं. घटनेने आपल्याला भाषावार प्रांतरचना दिली आहे. घटनात्मक लढा देऊन मुंबई महाराष्ट्राने मिळवली आहे. मुंबईचं मराठीपण टिकवण्याची जबाबदारी आपली. हिंदीचा, इंग्रजीचा दुस्वास न करताही मराठी आपली आहे. मुंबई ही सगळ्या भारतियांचीही नक्कीच आहे, पण इथे येऊन दादागिरी करणाया उपयांची नक्कीच नाही. ती महाराष्ट्राची आहे आणि तिची अधिकृत भाषा मराठी आहे हे मान्य करा आणि मग इथे राहा. मराठी माणूस सहिष्णु आहे ह्याचा अर्थ तो षंढ आहे असा काढू नका. चवताळून उठला तर मदांध तख्त फोडण्याचे सामर्थ्य मराठी भाषेत तसेच माणसांत नक्कीच आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने ते सप्रमाण सिद्ध केलय. दुर्दैवाचा भाग असा की, पूर्वापार महाराष्ट्राला दुही ने स्वकीयांचा जेवढा त्रास झालाय तितका त्रास इतर राज्यांना झाला नसावा. अबू आझमी सारखा उपरा मराठी अस्मितेचा अपमान महाराष्ट्राच्या विधानसभेत करतो आणि मनसे सोडली तर इतर मराठी भाषिक आमदार गप्प राहातात साधा निषेध सुद्धा करत नाहीत हे मराठीचेच दुर्दैव, मला खरच त्या सगळ्या आमदारांची लाज वाटते.. आज अत्रे असायला हवे होते, मराठात एक सणसणीत अग्रलेख वाचायला मिळाला असता असं वाटल्यावाचून राहावत नाही. स्वत:ला छत्रपती म्हणवून ताठ मानेने उभे राहाणारे शिवराय एकच, बाकी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले असं आपण म्हटलं तरी बयाच मराठी सरदारांनी दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्यातच समाधान मानलं आणि त्यांची गादी पुढे ह्या महाराष्ट्रातल्या कॊंग्रेजी नेत्यांनी चालवली, यशवंतराव, शंकररावांपासून अगदी अंतुले, देशमुख, अशोकरावांपर्यंत. इतकेच काय जेव्हा वरळीच्या पूलाचे उद्घाटन झाले तेव्हा शरद पवारांनी पूलास राजीव गांधींचे नाव द्यावे असे भाषणात सांगून सोनियाजींना खूष करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या सागरी सेतूवर टांगला. ह्याच साठी राष्ट्रवादीची स्थापना झाली होती का हा प्रश्न त्यांना कोण विचारणार? मराठी माणूस कितीही कर्तुत्ववान म्हटला तरी असा दिल्लीपुढे नतमस्तक होण्यात धन्यता मानतो हेच महाराष्ट्रचं दुर्दैव.
तर यातून पुढे काय? राजसाहेबांनी सुरुवात तर चांगली केलेय. त्यांचे ४ आमदार गेले पण त्यांनी बरच काही कमवलय. पुढच्या निवडणूकांत ह्याचा मनसेला फायदा नक्की होणार. बसेस जाळणे, तोडफोड असले प्रकार थांबवून काही विधेयक कामे राजसाहेब करतात का हे पहायचे. सचिनला मुद्दाम अस्थायी प्रश्न विचारून हिंदी माध्यमांनी पुन्हा एकदा मराठी माणूस फोडायचा प्रयत्न केलाय आणि सचिनच्या वक्तव्यावर टीका करून बाळासाहेबांनी पुन्हा आफत ओढवून घेतलेय.(आठवा पूर्वी महाराष्ट्रभूषण पु. लं वर बाळासाहेबांनी अशीच आगपाखड करुन मराठी मनाला नख लावलं होतं), तर उद्धवसाहेब गप्प! (सेनेचे असं सगळंच चुकत चाल्लय का?) सगळ्यात म्हणजे मराठी माणूस फक्त प्रांतिक आणि संकुचित विचार करतो असं गरळ ओकून हिंदी मिडीया धूळफेक करू पाहात आहे. राष्ट्रीयत्वाचा हिरीरेने पुरस्कार करणाया आणि त्यासाठी सर्वस्वाची होळी करणाया टिळक, आगरकर, फडके, सावरकर ह्यापासून अगदी कामटे, ओंबाळे, करकरे आणि साळसकर सगळ्यांच्याच कर्तव्यदक्षतेचा, राष्ट्रभक्तीचा हा अपमान आहे. ह्यापासून आपण वेळीच सावध व्हायला हवं. ह्यासाठी मी काय करू शकतो --
१. मराठी बाणा आणि राष्ट्रभक्ती ह्या परस्पर पूरक गोष्टी आहेत हे ठणकावून सांगायला हवं.
२. मुंबईत काम करणाया परप्रांतियांना सामावून घेताना ते इथल्या संस्कृतीत सामावले जातील हे बघायला हवं. घटनेने दिलेले स्थानिकांचे हक्क डावलून बाहेरून आलेल्यांचे फाजील लाड होणार नाहीत हे पहायला हवं
३. स्थानिकांना कामात, नोकयांत प्राधान्य मिळेल (उदा. स्थानियलोकाधिकार समिती) ह्याचा पाठपुरावा करायला हवा
४. पुढची पिढी जागतिक स्पर्धेसाठी तयार करताना (इंग्रजी माध्यमात शिकण्यात काहीच गैर नाही, उलट आवश्यकच आहे) त्यांना मराठी भाषा आणि संस्कृतीची ओळख आणि आवड राहील ह्याची जबाबदारी घ्यायला हवी.
अजून बरंच काही करता येण्यासारखं आहे पण मराठीच्या मुद्द्यावरुन सजग राहाण हे तूर्त महत्त्वाचं.
जय हिंद! जय महाराष्ट्र! (होय, महाराष्टाच्या जयजयकारा आधी भारताचा जयजयकार होतोच नेहमी, त्यामुळे मराठ्यांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेण्याची गरज नाही!)
Sunday, November 22, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
What was the mistake of Abu Azami? The points you have mentioned about 'proud of being Marathi' are ok but if somebody does not want to speak language then in democracy how we can force him to speak and that too against onstitution?
Did you forget Ramesh Kini case? I stil remember that widow blaming Raj who allegedly forme Yuti with one non-Marathi builder and hlped him eliminating Raesh Kini.
अबू आझमीची चूक की जिथे तो इतके वर्षे राहातोय तिथे भाषा, संस्कृती ह्यात समरस झाला नाहीच उलट हेकेखोरपणा, अकारण हट्ट, अरेरावी ह्यांद्वारे त्याने मराठीचा, मराठी माणसाचा अपमान, उपमर्द केला. लोकशाहीचा अर्थ वाट्टेल तसे वागणे नव्हे, भाषावार प्रांतरचनेला मान देऊन स्थानिकांचा आदर राखत तेथील भाषा, संस्कृती जपणे म्हणजे लोकशाहीचा स्वीकार आहे. मग इतकेच असेल तर काश्मीरमध्ये ३७० कलम अजून कसे, मग तेव्हा कुठे जाते लोकशाही? रेल्वेत सरसकट बिहारी आणि भय्ये भरले गेले इतके वर्षे तेव्हा कुठे गेली लोकशाही? ’नाठाळाचे काठी हाणू माथा’ असं जर नाही वागलं ना आज तर धनदांडगे बसलेलेच आहेत स्वायत्त मुंबई मागायला, त्यामुळे मराठी माणसाचा आवाज आणि हात उठला ते चांगलेच झाले.
मी ह्या उतायात राज ठाकरे ह्यांची व्यक्तिपूजा आणि उदात्तीकरण मुळ्ळीच करत नाहीये पण त्यांची मराठीच्या मुद्द्यावरील आक्रमकता विचार घेण्याजोगी आहे हे नक्की. शिवसेने भाजपाशी युती करुन, अमराठी व्यक्तिंना (चंद्रिका केनया, संजय निरुपम) राज्यसभेवर पाठवायला सुरुवात करुन आणि दोपहर का सामना छापून गेल्या काही वर्षात मराठीच्या प्रश्नापासून दूर व्हायला सुरुवात केली तेव्हा मराठी माणसाला, भाषेला, प्रादेशिक अस्मितेला कोणीतरी वाली हवाच होता तो मिळाला हे काही कमी नाही. अर्थात किणी प्रकरण, मिल्सची खरेदी विक्री, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दिलेल्या उमेद्वाया, राडेशाही, सामान्य माणसाला वेठीस धरायची पक्षाची वृत्ती अशा बयाच गोष्टी आहेत की मनसेच्या विरुद्ध जाणाया, ह्यातून राज खरेच कसा पुढे जातो हे पाहायचे.
Post a Comment