दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी मायबोलीवरील गणेशोत्सवात मी लिहिलेली आरती -
ओवाळू आरती देवा गणपती
माझी मति राहो दृढ तुझ्याप्रती..
ओवाळू आरती देवा गणपती.. ||धृ||
बुद्धिचा दाता तू, कलेचा प्रेमी
विघ्नांचा हर्ता, रिद्धि-सिद्धिंचा स्वामी
तुझ्या भक्तिने तुष्ट, शंकर पार्वती..
ओवाळू आरती देवा गणपती.. ||१||
माझी पूजा रत, तुझे चरणी
तूचि एक नित्य, नामस्मरणी
गोड घे मानुनि सेवा, मंगलमूर्ती..
ओवाळू आरती देवा गणपती.. ||२||
सर्वा सद्बुद्धी दे, ठेव समाधानी
मन रंगूनी जावो, गोड तुझ्या नामी
निरामय आरोग्य नि राहो सुख शांती..
ओवाळू आरती देवा गणपती.. ||३||
चालः ओवाळू आरती मदनगोपाळा किंवा ओवाळू आरती माता कलावती..
Monday, September 8, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment